My Blog Posting

Monday, November 28, 2011

विसरलो विसरलो विसरलो




NICE ONE……….

विसरलो

विसरलो

विसरलो.

हुशारी मिळवताना शहाणपण विसरलो I

समजत नाही मी घडलो की बिघडलो II

तंत्रज्ञानामागे धावताना आत्मज्ञान विसरलो I

पैसा हीच सक्ती समजून इश्वरभक्ती विसरलो II

सुख शोधताना जीवनाचा बोध विसरलो I

सुखासाठी साधने वापरताना साधना विसरलो II

भौतिक वस्तूच्या सुखात नैतिकता विसरलो I

धन जमा करताना समाधान विसरलो II

तंत्रज्ञान शोधताना ते वापरण्याचे भान विसरलो I

परिक्षार्थी शिक्षणात हाताचे कौशल्य विसरलो II

टी.व्ही. आल्यापासून बोलणं विसरलो

जाहिरातीच्या मार्‍यामुळे चागलं निवडणं विसरलो II

गाडी आल्यापासून चालणं विसरलो I

मोबाईल आल्यापासून भेटीगाठी विसरलो II

कॅलक्युलेटर आल्यापासून बेरीज विसरलो I

संगणकाच्या वापराने विचार करणं विसरलो II

संकरीत खाल्यामुळे पदार्थांची चव विसरलो I

फास्टफूडच्या जमान्यात तृप्तीचे ढेकर विसरलो II

ए.सी. मध्ये बसून झाडाचा गारवा विसरलो I

परफ्युमचा वापरामुळे फुलांचा सुगंध विसरलो II

चातुर्य मिळवताना चरित्र विसरलो I

जगाचा भूगोलात गावाचा इतिहास विसरलो II

बटबटीत प्रदर्शनात सौंदर्यचे दर्शन विसरलो I

रिमिक्सच्या गोंगाटात सुगमसंगीत विसरलो II

मृगजळामागे धावताना कर्तव्यातला आनंद विसरलो I

स्वतःमध्ये मघ्न राहून दुसर्‍याच्या विचार विसरलो II

सतत धावताना क्षणभर थांबणं विसरलो I

जागेपणी सुख मिळवताना सुखानं झोपणं विसरलो II